भुसावळ (प्रतिनिधी )-
आॅर्डनन्स फॅक्टरी लगत मंजूर करण्यात आलेले पोलीस प्रशिक्षण केंद्र अहमदनगरला न हलवता वरणगावातच ठेवण्यासाठी शिवसेना जळगाव जिल्हा प्रमुख व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली रावेर लोकसभा मतदार संघातील सर्व तालुका पदाधिकारी यांची बैठक मुक्ताईनगर येथे आयोजित करण्यात आली होती.
पोलीस प्रशिक्षण केंद्र हा जिल्ह्याच्या अस्मितेचा प्रश्न आहे म्हणून मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे हे शिवसेनेचे पक्ष प्रमुख असल्याने स्थानिक शिवसैनिक त्यांच्याकडे हट्ट करणार आहे. याची सुरुवात रविवार २८ रोजी सकाळी ९ वाजता वरणगावात बस स्टँड चौकात स्वाक्षरी अभियानाची सुरुवात करीत आहे. शिवसेना व सर्व अंगीकृत संघटना पदाधिकारी यांनी उपस्थित राहण्याचे आदेश जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.
भुसावळ तालुक्यातील असंख्य युवकांच्या रोजगाराचा प्रश्न या प्रकल्पातून सुटणार आहे म्हणून भुसावळचे स्थानिक आमदार व भुसावळ तालुक्यातील सर्व पक्षीय प्रतिनिधींनी स्वाक्षरी अभियानाला पाठिंबा द्यावा असे आवाहन तालुका प्रमुख समाधान महाजन यांनी केले आहे.
बैठकीस आमदार चंद्रकांत पाटिल , उपजिल्हा प्रमुख प्रल्हाद महाजन , मनोहर पाटिल रावेर , तालुका प्रमुख समाधान महाजन , छोटू भोई , गजानन खोडके बोदवड, शहर प्रमुख गणेश टोगे,गरलू बडगुजर , जिल्हा संघटक अल्पसंख्याक अफसर खान, संघटक विलास मुळे, विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे, तालुका संघटक प्रा.धिरज पाटील, यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.



