पदाचा दुरुपयोग केल्याच्या तक्रारीवरून मंडळ अधिकाऱ्या विरोधात विभागीय चौकशी सुरू ; केदारनाथ सानप यांच्या तक्रारीची प्रशासनाकडून दखल ;

भुसावळ (प्रतिनिधी) : येथील सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ वामन सानप यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव यांनी मंडळ अधिकारी प्रविण लक्ष्मण पाटील यांच्याविरोधात विभागीय चौकशीची कार्यवाही सुरू केली आहे.
केदारनाथ सानप यांनी दि. ९ जुलै २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. मंडळ अधिकारी प्रविण लक्ष्मण पाटील यांनी पदाचा दुरुपयोग करून नामंजूर नोंदी मंजूर करून घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर नियमानुसार कठोर कारवाई करावी, तसेच सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी सानप यांनी केली होती.
या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथील आस्थापना शाखा-३ कडून प्रविण पाटील यांना विभागीय चौकशीचे ज्ञापन बजावण्यात आले आहे. याबाबत पुढील कार्यवाही सुरू असल्याचे तहसीलदार (आस्थापना) ज्योती वसावे यांनी दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजीच्या पत्राद्वारे कळविले आहे. संबंधित पत्राचा क्रमांक आस्थाप-३/कावि/२०२४/१/६ असा आहे.
दरम्यान, प्रशासनातील कथित गैरप्रकारांविरोधात केलेल्या तक्रारीची दखल घेऊन विभागीय चौकशी सुरू झाल्याने हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे केदारनाथ सानप यांनी म्हटले आहे. संबंधित प्रकरणात चौकशी पूर्ण होऊन नियमानुसार कारवाई होईपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिला