भुसावळ विभागातील रेल्वे मार्गावर नॉन-इंटरलॉकिंग काम ; मुंबईकडे जाणाऱ्या काही प्रवासी रेल्वे गाड्या रद्द तर काहींच्या मार्गात बदल ;

 भुसावळ (प्रतिनिधी )- मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाकडून आगामी नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभ-२०२७ च्या व्यापक तयारीचा एक भाग म्हणून, रेल्वे सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी तसेच कुंभमेळ्यादरम्यान सुरक्षित, सुरळीत आणि कार्यक्षम रेल्वे परिचालन सुनिश्चित करण्यासाठी प्रमुख पायाभूत सुविधा आणि ट्रॅक सुधारणा कामे हाती घेण्यात आली आहेत.

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील इगतपुरी–भुसावळ दरम्यान कसबे सुकेने आणि खेरवाडी स्थानकांवर यार्ड पुनर्रचना कामाशी संबंधित नॉन-इंटरलॉकिंग काम करण्यात येणार आहे. या कामासाठी दिनांक ३० सप्टेंबर २०२६ (बुधवार) रोजी नॉन-इंटरलॉकिंग ब्लॉक घेण्यात येणार असून त्याचा परिणाम काही प्रवासी गाड्यांच्या परिचालनावर होणार आहे.  दि . ३०.०९.२०२६ रोजी गाड्याचे प्रस्थान स्थानक येथून रद्दीकरण करण्यात आले आहे . यामध्ये देवळाली -भुसावळ मेमू देवळाली  येथून रद्द , भुसावळ -देवळाली मेमू  भुसावळ येथून रद्द,  इगतपुरी -भुसावळ मेमू इगतपुरी येथुन रद्द, भुसावळ - इगतपुरी मेमू  येथून रद्द, बडनेरा -नाशिक मेमू बडनेरा येथून रद्द, नाशिक - बडनेरा मेमू नाशिक येथून रद्द तसेच गाडयांचे शॉर्ट टर्मिनेशन /शॉर्ट ओरिजिनेशन हिंगोली डेक्कन -मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस प्रवास सुरु दि . ३० रोजी हिंगोली डेक्कन येथून सुटणारी मनमाड स्थानक येथे शॉर्ट टर्मिनेशन करण्यात येईल. सदर गाडी मनमाड ते मुंबई दरम्यान रद्द राहील. मुंबई -हिंगोली डेक्कन जनशताब्दी एक्सप्रेस मुंबई स्थानक ऐवजी मनमाड येथून आपल्या नियोजित वेळेत सुटेल. सदर गाडी मुंबई ते मनमाड दरम्यान रद्द राहील. 
तसेच पुढील गाडयांचे मार्गात बदल करण्यात आला आहे .धनबाद लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस दि .२८ रोजी धनबाद येथून सुटणारी आपल्या नियोजित मार्गाऐवजी अंकाई, दौंड कॉर्ड लाईन, पुणे, लोणावळा मार्ग लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहचेल. गोरखपूर - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस दि .२९ रोजी गोरखपूर येथून सुटणारी आपल्या नियोजित मार्गाऐवजी अंकाई, दौंड कॉर्ड लाईन, पुणे, लोणावळा मार्ग लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहचेल. गोरखपूर - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस दि .२९ रोजी गोरखपूर येथून सुटणारी आपल्या नियोजित मार्गाऐवजी अंकाई, दौंड कॉर्ड लाईन, पुणे, लोणावळा मार्ग लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहचेल. पुरी - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस दि . २९ रोजी गोरखपूर येथून सुटणारी आपल्या नियोजित मार्गाऐवजी अंकाई, दौंड कॉर्ड लाईन, पुणे, लोणावळा मार्ग लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहचेल. मुंबई - लखनउ एक्सप्रेस दि .३० रोजी मुंबई येथून  सुटणारी आपल्या नियोजित मार्गाऐवजी लोणावळा, पुणे, दौंड कॉर्ड लाईन, अंकाई मार्ग लखनउ येथे पोहचेल. तसेच दि .३० रोजी काही गाड्या निफाड पर्यंत उशिराने धावतील यामध्ये पाटलीपुत्र - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, प्रयागराज - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, गोरखपूर - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, भागलपूर - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस - गोरखपूर एक्सप्रेस, मुंबई - आसनसोल एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस - जयनगर एक्सप्रेस या गाड्यांचा समावेश आहे . तर पायाभूत सुविधांची देखभाल आणि सुरक्षिततेसाठी हे ब्लॉक आवश्यक असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले .