भुसावळ तालुका खो-खो स्पर्धेत सुनसगावच्या मुलींची दुहेरी बाजी – जिल्हास्तरावर निवड !

भुसावळ (प्रतिनिधी) - तालुक्यातील सुनसगाव येथील दादासाहेब दामू पांडू पाटील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी 
जळगाव जिल्हा क्रीडा परिषद व भुसावळ तालुका शालेय क्रीडा स्पर्धा सन २०२६ -२७ अंतर्गत नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत दादासाहेब दामू पांडू पाटील माध्यमिक विद्यालय, सुनसगाव, ता. भुसावळ, जि. जळगाव च्या मुलींच्या संघाने घवघवीत यश संपादन करून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे त्याचप्रमाणे
या स्पर्धेत विद्यालयाच्या मुलींनी अंडर १४ आणि अंडर १७ या दोन्ही गटातील मुलींनी अंतिम फेरी गाठून विजय मिळवला आणि जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली.
अंडर १४ गट -महात्मा गांधी विद्यालय वरणगाव विरुद्ध दादासाहेब दामू पांडू पाटील माध्य. विद्यालय सुनसगाव यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात सुनसगावच्या मुलींच्या संघाने उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन करत विजय मिळवला.
अंडर १७ गट -ओझरखेडा हायस्कूल विरुद्ध दादासाहेब दामू पांडू पाटील माध्य. विद्यालय, सुनसगाव यांच्यात झालेल्या चुरशीच्या अंतिम सामन्यात सुनसगावच्या मुलींच्या संघाने बाजी मारत जिल्हास्तरावर प्रवेश मिळवला.
या दुहेरी यशाबद्दल संस्थेचे माननीय चेअरमन श्री. आर. डी. पाटील सर व विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. के. डी. तायडे सर यांनी सर्व विजयी खेळाडू व त्यांचे मार्गदर्शक क्रीडा शिक्षक श्री. यु. जी. राठोड सर यांचे हार्दिक अभिनंदन केले व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.