भुसावळ प्रतिनिधी : धनगर समाजाच्या विविध न्याय्य हक्कांच्या मागण्यांसाठी आज भुसावळचे प्रांताधिकारी श्री. जितेंद्र पाटील यांना निवेदन देण्यात आले. समाजाच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधून घेऊन प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक व तातडीने कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या निवेदनाद्वारे धनगर समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व विकासाशी संबंधित विविध प्रश्नांवर शासनाने गांभीर्याने विचार करून योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. समाजाच्या हक्कांसाठी संघटितपणे पाठपुरावा करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला. निवेदन देताना महाराणी अहिल्यादेवी महिला समाज प्रबोधन मंचाच्या सुजाता सोनवणे, राजश्री बादशहा, उषाताई झटकार, हेमलता शिरोळे, तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी अर्बन क्रेडिट को-ऑप. सोसायटी लि., भुसावळचे उपाध्यक्ष चंद्रशेखर सोनवणे व सचिव धोंडू मांगो वाघ, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे कार्यरत राजू भाऊ सावळे आणि मल्हार इलेक्ट्रिकलचे संचालक भरत सोनवणे उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी धनगर समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी शासन स्तरावर सकारात्मक निर्णय होणे आवश्यक असल्याचे सांगितले. प्रांताधिकारी श्री. जितेंद्र पाटील यांच्याकडे निवेदन सुपूर्द करून समाजाच्या प्रश्नांवर योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.



