वरणगावात सामाजिक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेशजिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश; कार्यकर्त्यांनी केले उत्स्फूर्त स्वागत

वरणगाव, ता. भुसावळ (प्रतिनिधी) — वरणगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते राजेश बोदडे, त्यांच्या पत्नी सौ. ललिता बोदडे तसेच सौ. आरती माळी, सौ. कविता जाधव आणि सौ. रेखा गायकवाड यांनी जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते ना. . एकनाथरावजी शिंदे, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.  गुलाबरावजी पाटील तसेच मुक्ताईनगरचे आमदार. चंद्रकांत पाटील यांच्या कार्यावर विश्वास व्यक्त करत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे सांगितले.
यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक . विलास मुळे, विधानसभा प्रमुख . संतोष माळी, ज्येष्ठ नगरसेवक . राजेंद्र विश्वनाथ चौधरी, शहरप्रमुख दुर्गेश बेदरकर, महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख सौ. सविता माळी, सौ. मनीषा पाटील, सौ. रेखा देशमुख यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नवीन प्रवेश केलेल्या सर्वांचे शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पक्षाच्या माध्यमातून सामाजिक व जनसेवेचे कार्य अधिक प्रभावीपणे करण्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.