भुसावळ (प्रतिनिधी)- रेल्वे प्रशासनाद्वारे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन कोयंबतूर-जयपूर-कोयंबतूर दरम्यान साप्ताहिक विशेष रेल्वे चालविण्यात येणार आहे. तपशील पुढीलप्रमाणे राहील गाडी क्रमांक 06181 साप्ताहिक विशेष दिनांक 13 ऑगस्ट 2026 ते 03 सप्टेंबर 2026 पर्यंत प्रत्येक गुरुवार रोजी कोयंबतूर येथून 02.30 वाजता सुटेल आणि जयपूर येथे शनिवार रोजी 13.25 वाजता पोहचेल. गाडी क्रमांक 06182 साप्ताहिक विशेष दिनांक 16 ऑगस्ट 2026 ते 06 सप्टेंबर 2026 पर्यंत प्रत्येक रविवार रोजी जयपूर येथून 22.05 वाजता सुटेल आणि कोयंबतूर येथे बुधवार रोजी 08.30 वाजता पोहचेल. थांबे -तिरुपूर, इरोड, सेलम, जोलारपेट्टई, काटपाडी, रेणीगुंटा, कडपा, येर्रागुंटला, गुट्टी, धोने, कर्नूल सिटी, गडवाल, महबूबनगर, काचीगुडा, कामारेड्डी, निजामाबाद, बासर, मुदखेड, हजूर साहिब नांदेड, पूर्णा, हिंगोली डेक्कन, वाशीम, अकोला, मलकापूर, भुसावळ, जळगाव, धरणगाव, नंदुरबार, उधना, भरूच, वडोदरा, गोध्रा, रतलाम, जावरा, मंदसौर, निमच, चित्तौडगड, भिलवाडा, बिजयनगर, नसीराबाद, अजमेर आणि किशनगड. संरचना - 18 वातानुकूलित तृतीय इकॉनॉमी आणि 2 जनरेटर व्हॅन. प्रवासी तिकीट बुकिंगसाठी रेलवन (RailOne) ॲप देखील डाउनलोड करू शकतात. या विशेष गाड्यांच्या थांब्यांवरील सविस्तर वेळापत्रकासाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.


