भादली येथील नॉन-इंटरलॉकिंग कामामुळे भुसावळ ते दादर खान्देश एक्सप्रेसच्या संचालनात बदल ;

भुसावळ (प्रतिनिधी)- भुसावळ विभाग अंतर्गत इगतपुरी–भुसावळ दरम्यान भादली ते जळगाव पाचव्या रेल्वे मार्गाच्या प्रकल्पाअंतर्गत भादली स्थानकाच्या यार्डची पुनर्रचना तसेच पाचव्या मार्गासाठी जोडणी उपलब्ध करून देण्यासाठी नॉन-इंटरलॉकिंगचे महत्त्वपूर्ण काम हाती घेण्यात आले आहे.

या कामामुळे यापूर्वी गाडी क्रमांक १९००४ भुसावळ–दादर खान्देश एक्सप्रेस दिनांक १२ ऑगस्ट २०२६ रोजी पूर्णतः रद्द करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. तथापि, प्रवाशांच्या सोयीचा विचार करून या गाडीच्या संचालनात खालीलप्रमाणे बदल करण्यात आला आहे.

१) गाडी क्रमांक १९००३ दादर - भुसावळ खान्देश एक्सप्रेस दिनांक १२.०८.२०२६ रोजी दादर येथून सुटणारी गाडी अमळनेर स्थानक पर्यंत धावेल. सदर गाडी अमळनेर ते भुसावळ दरम्यान रद्द राहील. 
२) गाडी क्रमांक १९००४ भुसावळ - दादर खान्देश एक्सप्रेस दिनांक १२.०८.२०२६ रोजी अमळनेर स्थानक येथून आपल्या नियोजित वेळेत सुटेल. सदर गाडी भुसावळ ते अमळनेर दरम्यान रद्द राहील. 

मध्य रेल्वे, भुसावळ विभाग आवाहन करते कि प्रवाशांनी कृपया या बदलाची नोंद घ्यावी व त्यानुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करावे.