भुसावळ उपविभागीय कार्यालयात 6 ऑगस्ट 2026 वार गुरुवार रोजी ‘जनसमाधान बैठक’ चे आयोजन : नागरिकांचे प्रलंबित प्रश्न व तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतील जिल्हा प्रशासनाचा नाविण्यपुर्ण उपक्रम; नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन :

भुसावळ(प्रतिनिधी ) - जळगाव जिल्हयातील नागरीकांच्या विविध समस्या, दैनदिन प्रशासकीय प्रश्न, अडीअडचणी आणि तक्रारीचे स्थानिक (क्षेत्रिय) स्तरावर अत्यंत गतीने व कालबध्द निवारण व्हावे, या उद्देशाने मा. जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून "जनसमाधान बैठक" हा एक महत्वपूर्ण व लोकाभिमुख उपक्रम जिल्हयातील उपविभाग स्तरावर आयोजित करण्यात करण्यात येणार असून मा. जिल्हाधिकारी स्वतः दर गुरुवारी जिल्हयातील संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात प्रत्यक्ष भेट देऊन अथवा उपविभागीय अधिकारी कार्यालयात या जनसमाधान बैठकीसाठी उपस्थित राहून जनतेच्या समस्या जाणून घेणार आहेत.

भुसावळ उपविभागातील नागरिकांचे विविध महसुली व प्रशासकीय प्रश्न, प्रलंबित तक्रारी तसेच स्थानिक अडचणींचे एकाच छताखाली गतीने निवारण व्हावे, या उद्देशाने जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष आढावा व जनसमाधान बैठकांचे सत्र आयोजित करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत गुरुवार, दिनांक 06 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता भुसावळ उपविभागीय कार्यालयात 'जनसमाधान बैठक' संपन्न होणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या आढावा बैठकांच्या वेळापत्रकानुसार, भुसावळ उपविभागातील सर्व संबंधित शासकीय विभागांचे प्रमुख व अधिकारी या बैठकीस आवश्यक ती सर्व माहिती, सादरीकरण व प्रलंबित प्रकरणांच्या नस्तींसह प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत.
 भुसावळ उपविभाग जनसमाधान बैठक
गुरुवार, 06 ऑगस्ट 2026 रोजी  सकाळी 11 वाजता
  तापी सभागृह, उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आले आहे. 

   कार्यक्रमास  रोहन घुगे जिल्हाधिकारी  
असून उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व सर्व संबंधित विभागप्रमुख आदी उपस्थित राहणार आहे.बैठकीची मुख्य उद्दिष्टभुसावळ उपविभागातील नागरिकांचे प्रलंबित महसुली अर्ज, फेरफार नोंदी, जमिनीशी संबंधित वाद व प्रशासकीय तक्रारींचा तात्काळ निपटारा करणे.विविध शासकीय योजनांचे लाभ मिळण्यातील अडचणी दूर करून संबंधित विभागांमार्फत थेट मार्गदर्शन व मदत उपलब्ध करून देणे. प्रशासकीय कामात पारदर्शकता व गतिमानता आणून सर्वसामान्य जनतेला दिलासा देणे.

तरी भुसावळ उपविभागातील नागरिक, शेतकरी व अर्जदारांनी आपल्या प्रलंबित मागण्या व तक्रारींचे अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह या बैठकीत सादर करावेत आणि या 'जनसमाधान बैठकीचा' जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन.जितेंद्र पाटील  उपविभागीय अधिकारी  भुसावळ व जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.