भुसावळ, प्रतिनिधी : भुसावळ तालुका शासकीय क्रीडा स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा शिक्षकांची सहविचार सभा गुरुवारी (दि. ३०) पु. ओ. नाहाटा महाविद्यालयाच्या लायब्ररी हॉलमध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. सभेला तालुक्यातील ५२ क्रीडा शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. त्यानंतर मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे, तालुका क्रीडा अधिकारी नितीन जंगम, क्रीडा अधिकारी सचिन निकम, डॉ. सुरेश थुरकुडे, विशाल बोडके, प्रा. डॉ. संजय चौधरी, वाय. एम. पाटील, आर. आर. धनगर, महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष व तालुका क्रीडा समन्वयक डॉ. प्रदीप साखरे, जिल्हा क्रीडा संकुलाचे माने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सभेचे प्रास्ताविक डॉ. प्रदीप साखरे यांनी केले. त्यांनी तालुका क्रीडा स्पर्धांचे नियोजन, आयोजन आणि यशस्वी अंमलबजावणीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी विलास पाटील यांचा टाटा मुंबई मॅरेथॉन (४२ कि.मी.) सलग तीन वेळा पूर्ण केल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. तसेच अनिल महाजन, डी. आर. धांडे, आर. एस. कुरेशी यांना आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल, तर रितेश तायडे यांना राष्ट्रीय कबड्डी पंच परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल गौरविण्यात आले. मागील वर्षी शासकीय क्रीडा स्पर्धांचे यशस्वी आयोजन करणाऱ्या ताप्ती पब्लिक स्कूल, सेंट अलॉयसिस स्कूल व बियाणी मिलिटरी स्कूल येथील क्रीडा शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला. मार्गदर्शन करताना गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे यांनी मुख्याध्यापकांनी शासकीय क्रीडा स्पर्धांना पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन केले. डॉ. सुरेश थुरकुडे यांनी ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेची माहिती दिली. अध्यक्षीय समारोपात जिल्हा क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी यांनी जास्तीत जास्त खेळाडूंचा सहभाग वाढवून स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले. सभेत विविध क्रीडा स्पर्धांचे स्थळ व वेळापत्रक निश्चित करण्यात आले. विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसह पालकांमध्ये शासकीय क्रीडा स्पर्धांबाबत जनजागृती करण्यावरही विशेष भर देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास पाटील यांनी केले, तर आभार प्रा. मनोज वारके यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नाहाटा महाविद्यालय, महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे भुसावळ तालुका पदाधिकारी व सर्व क्रीडा शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले



