रेल्वे कर्मचाऱ्यांना रेलकामगार सेनेतर्फे अर्सेनिक ३० गोळ्यांचे वाटप ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोनावायरसच्या विषाणूचा वाढता प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे अश्या परिस्थितीत रेल्वे कर्मचारी सुध्दा आपल्या ड्यूटी करीत आहे ,त्यांचे रक्षणासाठी व हे संकट
लक्षात घेऊन कोरोनावायरसशी लढण्यासाठी रेल्वे कर्मचारी यांची सुद्धा प्रतिकार शक्ति वाढावी या करीता केंद्र सरकारने सुचवलेल्या आर्सेनिक एल्बम ३० या गोळ्यांचे वाटप भुसावळ रेलकामगार सेनेचे विभागीय अध्यक्ष ललित कुमार मुथा यांचे नेतृत्वात येथील विद्युत इंजन कारखाना (पीओएच ) येथे १०००/- बाॅटल्स कर्मचारी बांधवांना वितरण करण्यात आले आहे
रेलकामगार सेना ही विश्वसनीय संघटना असून प्रसंगानुसार कर्मचाऱ्यांवर येणाऱ्या संकटांची चाहूल लागताच त्यांवरील संकट आपल्या पद्धतीने सर्वेक्षण करून सोडवण्यासाठी प्रयत्न करत असते तसेच या पुढे सुध्दा कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही विभागीय अध्यक्ष ललित कुमार मुथा यांनी यावेळी दिली.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रेल कामगार सेनेचे विभागीय अध्यक्ष ललित कुमार मुथा ,विभागीय कार्याध्यक्ष प्रितम कुमार टाक , विनोद वाघे,यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्यातील अध्यक्ष किरण मलबारी, सचिव मानवेन्द्रे सिंग कार्याध्यक्ष अरविंद थोरात ,कोषाध्यक्ष भरत शर्मा,प्रमोद हिवरे, मुकेश महाजन, निरंजन राऊत,प्रविण कोळी, पंकज पाटील,स्वप्निल इंगळे, दिनेश पोते, शब्बीर चाचा,मधुकर गायकवाड, विलास गोसावी,हेमंत पाटील, विशाल कुंवर, व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *