भुसावळात भारतीय जनता पार्टीच्या वतीने हरिभाऊ जावळे यांना श्रद्धांजली ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
भारतीय जनता पार्टी भुसावळ शहराच्या वतीने माजी खासदार तथा आमदार व भाजपा जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
सदर प्रसंगी भाजपाचे जिल्हा संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे सर यांनी थोडक्यात हरिभाऊंच्या जीवनपट आणि त्यांच्या कामांविषयी माहिती दिली.
यावेळी भुसावळ तालुक्याचे आमदार संजय सावकारे,लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे,ओबीसी मोर्चा प्रदेश सरचिटणीस अजय भोळे,शहराध्यक्ष दिनेश नेमाडे,सरचिटणीस पवन बुंदेले आणि अमोल महाजन , नगरसेवक अमोल इंगळे,गिरीष महाजन,वसंतदादा पाटील,मुकेश पाटील,देवा वाणी,सतीश सपकाळे,पुरुषोत्तम नारखेडे,अजय नागराणी,बोधराज चौधरी,किशोर पाटील आणि पदाधिकारी प्रमोद पाटील,रमाशंकर दुबे,गौरव लोणारी,शाम भांरबे,चेतन बोरोले आदि शोकाकुल उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *