प्रवाशांनी प्रवासापूर्वी गाडीची अद्ययावत माहिती तपासावी
भुसावळ प्रतिनिधी - दक्षिण पूर्व रेल्वेच्या हावडा विभागातील हावडा स्थानकावर लिंक केबिनचे काम पूर्ण करण्यासाठी नॉन-इंटरलॉकिंगचे काम करण्यात येणार आहे. या कामादरम्यान काही मेल/एक्सप्रेस गाड्यांच्या प्रारंभ व समाप्ती स्थानकात तात्पुरता बदल करण्यात आला आहे. भुसावळ विभागातून धावणाऱ्या गाड्यांची माहिती पुढीलप्रमाणे आहे – * गाडी क्रमांक 12834 हावडा–अहमदाबाद एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक 24 व 25 जुलै 2026 रोजी आपल्या नियोजित प्रारंभ स्थानक हावडा ऐवजी शालीमार स्थानकावरून सुटेल. * गाडी क्रमांक 12859 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–हावडा गीतांजली एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक 24 व 25 जुलै 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटून सांतरागाछी स्थानकापर्यंतच धावेल व तेथेच समाप्त होईल. * गाडी क्रमांक 12860 हावडा–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गीतांजली एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक 25 व 26 जुलै 2026 रोजी आपल्या नियोजित प्रारंभ स्थानक हावडा ऐवजी सांतरागाछी स्थानकावरून नियोजित वेळेनुसार सुटेल. * गाडी क्रमांक 12809 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–हावडा मेल एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक 24 जुलै 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटून सांतरागाछी स्थानकापर्यंतच धावेल व तेथेच समाप्त होईल. * गाडी क्रमांक 12810 हावडा–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेल एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक 25 व 26 जुलै 2026 रोजी आपल्या नियोजित प्रारंभ स्थानक हावडा ऐवजी सांतरागाछी स्थानकावरून नियोजित वेळेनुसार सुटेल. * गाडी क्रमांक 22893 साईनगर शिर्डी–हावडा एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक 25 जुलै 2026 रोजी साईनगर शिर्डी येथून सुटून सांतरागाछी स्थानकापर्यंतच धावेल व तेथेच समाप्त होईल. * गाडी क्रमांक 12221 पुणे–हावडा दुरांतो एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक 25 जुलै 2026 रोजी पुणे येथून सुटून शालीमार स्थानकापर्यंतच धावेल व तेथेच समाप्त होईल. * गाडी क्रमांक 12129 पुणे–हावडा आझाद हिंद एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक 25 जुलै 2026 रोजी पुणे येथून सुटून सांतरागाछी स्थानकापर्यंतच धावेल व तेथेच समाप्त होईल. रेल्वे प्रशासन प्रवाशांना विनंती करते की, प्रवासास निघण्यापूर्वी आपल्या गाडीची अद्ययावत माहिती रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर, NTES किंवा RailOne ॲपद्वारे अवश्य तपासावी, जेणेकरून कोणतीही गैरसोय होणार नाही


