मा .नरेंद्र मोदींच्या ऐतिहासिक विक्रमाबद्दल श्री अष्टभुजा माता मंदिरात विशेष महाआरती

जळगाव (प्रतिनिधी) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग सर्वाधिक काळ जनतेतून निवडून आलेले पंतप्रधान म्हणून नवा इतिहास रचल्याच्या पार्श्वभूमीवर जामनेर रोडवरील श्री अष्टभुजा माता मंदिर येथे विशेष पूजा-अर्चना व महाआरतीचे आयोजन करण्यात आले.

या प्रसंगी राष्ट्राच्या प्रगतीसाठी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निरोगी, दीर्घ आणि यशस्वी आयुष्य लाभावे यासाठी भाविकांनी प्रार्थना केली. मंदिर परिसरात उत्साहपूर्ण वातावरणात वस्त्रोद्योग मंत्री ना संजयभाऊ सावकारे यांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली.

कार्यक्रमास भाजपा जळगाव पूर्व चंद्रकांत बाविस्कर  जळगाव विधानपरिषदेचे उमेदवार नंदकिशोर महाजन,यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचत असल्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच ‘विकसित भारत’ या संकल्पनेला अधिक बळ मिळावे, अशी प्रार्थना करण्यात आली.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी मोदी यांच्या ऐतिहासिक कार्यकाळाबद्दल अभिनंदन व्यक्त करत देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.