पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागात दौंड-मनमाड विभागातील विसापूर-रांजणगाव-सारोळा स्थानकांदरम्यान दुहेरीकरणाच्या कामासाठी प्री-नॉन इंटरलॉकिंग (Pre-NI) आणि नॉन-इंटरलॉकिंग (NI) कामे हाती घेण्यात येणार आहेत. या कामांसाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार असून, त्यामुळे अनेक रेल्वे गाड्यांवर परिणाम होणार आहे. काही गाड्या रद्द करण्यात आल्या असून, काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत, तर काही गाड्या उशिराने धावणार आहेत.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि पायाभूत सुविधांच्या उन्नतीसाठी हे काम आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.
रद्द करण्यात आलेल्या गाड्या :
- 11026 अमरावती-पुणे एक्सप्रेस (27 व 29 मे)
- 11025 पुणे-अमरावती एक्सप्रेस (28 व 30 मे)
- 01922 वीरांगना लक्ष्मीबाई झाँसी-हडपसर विशेष (27 मे)
- 01921 हडपसर-वीरांगना लक्ष्मीबाई झाँसी विशेष (28 मे)
- 01458 नागपूर-पुणे विशेष (28 मे)
- 01457 पुणे-नागपूर विशेष (27 मे)
मार्ग बदलण्यात आलेल्या प्रमुख गाड्या :
हावडा-पुणे एक्सप्रेस, अमरावती-पुणे एक्सप्रेस, पुणे-अमरावती एक्सप्रेस, हडपसर-बनारस एक्सप्रेस, केएसआर बंगळूर-नई दिल्ली एक्सप्रेस, यशवंतपूर-चंदीगड एक्सप्रेस, जम्मूतावी-पुणे एक्सप्रेस, निजामाबाद-पुणे एक्सप्रेस, दौंड-निजामाबाद एक्सप्रेस, हडपसर-हजुर साहेब नांदेड एक्सप्रेस, पुणे-नागपूर एक्सप्रेस, हुबळी-हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस, पुणे-गोरखपूर एक्सप्रेस तसेच हजरत निजामुद्दीन-वास्को दि गामा एक्सप्रेस या गाड्यांचे पर्यायी मार्गाने संचालन करण्यात येणार आहे.
उशिराने सुटणाऱ्या गाड्या :
- 20151 हडपसर-रेवा एक्सप्रेस – 2 तास उशिराने
- 01415 पुणे-गोरखपूर विशेष – 8 तास उशिराने
- 12221 पुणे-हावडा दुरांतो एक्सप्रेस – 3 तास उशिराने
- 01449 पुणे-दानापूर विशेष – 3 तास उशिराने
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवासापूर्वी आपल्या गाडीची स्थिती तपासूनच प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. तसेच या कामांमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल सहकार्य करण्याची विनंतीही करण्यात आली आहे.


