भुसावळ (प्रतिनिधी ) – टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन ऑफ महाराष्ट्रतर्फे २४ वी जूनियर १९ वर्षांखालील मुले व मुलींच्या राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे ४ ते ६ जून २०२६ दरम्यान करण्यात आले आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचा मुले व मुलींचा संघ निवडण्यासाठी सोमवार, २५ मे रोजी दुपारी ४ वाजता भुसावळ येथील नाहाटा महाविद्यालयाच्या मैदानावर निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.
या निवड चाचणीत सहभागी होणाऱ्या खेळाडूंची जन्मतारीख ३० जून २००७ नंतरची असणे बंधनकारक असून, तेच खेळाडू या चाचणीसाठी पात्र ठरतील. चाचणीसाठी येताना खेळाडूंनी सोबत स्वतःचे आधार कार्ड, जन्म दाखल्याची छायांकित प्रत (झेरॉक्स) आणि क्रिकेटच्या परिपूर्ण गणवेशात उपस्थित राहावे, अधिक माहितीसाठी जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे सचिव वासेफ पटेल यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



