जनजातीय संस्कृती समागमासाठी रेल्वेची विशेष सुविधा; नवी दिल्लीसाठी धावणार पाच विशेष गाड्या

भुसावळ (प्रतिनिधी) – जनजातीय संस्कृती समागम कार्यक्रमासाठी प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने नवी दिल्लीकडे जाणाऱ्या विशेष रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांमुळे प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. विविध मार्गांवरून एकूण पाच विशेष गाड्या सोडण्यात येणार असून त्यात भुसावळ, पुणे आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सेवा उपलब्ध राहणार आहे.

१) भुसावळ – हजरत निजामुद्दीन विशेष (२ फेऱ्या)

गाडी क्रमांक 01121 विशेष दिनांक २२ मे २०२६ रोजी भुसावळ येथून दुपारी १.१० वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी हजरत निजामुद्दीन येथे रात्री १०.३० वाजता पोहोचेल.
परतीची गाडी क्रमांक 01122 दिनांक २५ मे २०२६ रोजी हजरत निजामुद्दीन येथून पहाटे ३.२० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ७.१० वाजता भुसावळ येथे पोहोचेल.

थांबे : नांदुरा, अकोला, बडनेरा, धामणगाव, वर्धा, नागपूर, राणी कमलापती, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी आणि आग्रा कॅन्ट.

२) लोकमान्य टिळक टर्मिनस – पटेल नगर विशेष (२ फेऱ्या)

गाडी क्रमांक 01055 विशेष दिनांक २२ मे २०२६ रोजी रात्री १०.१० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल व तिसऱ्या दिवशी सकाळी ५.३० वाजता पटेल नगर येथे पोहोचेल.
परतीची गाडी क्रमांक 01056 दिनांक २४ मे २०२६ रोजी रात्री १०.१० वाजता पटेल नगर येथून सुटून तिसऱ्या दिवशी सकाळी ५.०० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

थांबे : इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, भुसावळ, इटारसी, राणी कमलापती, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी आणि आग्रा कॅन्ट.

३) लोकमान्य टिळक टर्मिनस – पटेल नगर विशेष (२ फेऱ्या)

गाडी क्रमांक 01057 विशेष दिनांक २१ मे २०२६ रोजी रात्री १०.१० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल व तिसऱ्या दिवशी सकाळी ६.०० वाजता पटेल नगर येथे पोहोचेल.
परतीची गाडी क्रमांक 01058 दिनांक २४ मे २०२६ रोजी रात्री ११.३० वाजता पटेल नगर येथून सुटून तिसऱ्या दिवशी सकाळी ५.१० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

थांबे : इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, इटारसी, राणी कमलापती, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी आणि आग्रा कॅन्ट.

४) पुणे – शकूर बस्ती विशेष (२ फेऱ्या)

गाडी क्रमांक 01439 विशेष दिनांक २२ मे २०२६ रोजी पहाटे ४.०० वाजता पुणे येथून सुटेल व दुसऱ्या दिवशी दुपारी १२.१० वाजता शकूर बस्ती येथे पोहोचेल.
परतीची गाडी क्रमांक 01440 दिनांक २५ मे २०२६ रोजी पहाटे २.३० वाजता शकूर बस्ती येथून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ११.१० वाजता पुणे येथे पोहोचेल.

थांबे : अहिल्यानगर, मनमाड, भुसावळ, इटारसी, राणी कमलापती, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी आणि आग्रा कॅन्ट.

५) लोकमान्य टिळक टर्मिनस – शकूर बस्ती विशेष (२ फेऱ्या)

गाडी क्रमांक 01059 विशेष दिनांक २१ मे २०२६ रोजी सकाळी ५.१० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल व दुसऱ्या दिवशी दुपारी २.३० वाजता शकूर बस्ती येथे पोहोचेल.
परतीची गाडी क्रमांक 01060 दिनांक २५ मे २०२६ रोजी रात्री १२.१० वाजता शकूर बस्ती येथून सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी ४.३० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

थांबे : पनवेल, कर्जत, लोणावळा, पुणे, मनमाड, भुसावळ, इटारसी, राणी कमलापती, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी आणि आग्रा कॅन्ट.

या सर्व विशेष गाड्यांमध्ये १८ शयनयान, २ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ सामान व गार्ड ब्रेक व्हॅनचा समावेश असणार आहे.

प्रवाशांनी तिकीट आरक्षणासाठी RailOne ॲपचा वापर करावा, तसेच सविस्तर वेळापत्रकासाठी भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा NTES ॲप डाउनलोड करावे.