भुसावळ (प्रतिनिधी) –
तांत्रिक कारणास्तव हजूर साहिब नांदेड – लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान सुरू होणाऱ्या विशेष व साप्ताहिक एक्सप्रेस गाड्या पुढील आदेशापर्यंत पुढीलप्रमाणे रद्द करण्यात येत आहेत : गाडी क्रमांक 07667 उद्घाटन विशेष गाडी दिनांक 19.05.2026 रोजीची गाडी रद्द करण्यात आली आहे.

- गाडी क्रमांक 07813 विशेष एकेरी गाडी दिनांक 20.05.2026 रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणारी गाडी रद्द करण्यात आली आहे.
- गाडी क्रमांक 17667/17668 हजूर साहिब नांदेड – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक एक्सप्रेस गाडी रद्द करण्यात आली आहे.
- गाडी क्रमांक 17665/17666 हजूर साहिब नांदेड – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक एक्सप्रेस गाडी रद्द करण्यात आली आहे.
प्रवाशांनी कृपया याची नोंद घ्यावी.


