भुसावळात मोफत रोग निदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; गोल्डन अवर हॉस्पिटल व स्व. राजीव गांधी वाचनालयाचा संयुक्त उपक्रम; 50 रुग्णांनी घेतला लाभ

भुसावळ (प्रतिनिधी )- शहरातील नसरवांजी फाईल परिसरातील स्व. राजीव गांधी वाचनालय येथे गोल्डन अवर हॉस्पिटलच्या वतीने मोफत रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. काँग्रेसचे मो. मुनव्वर खान यांच्या पुढाकारातून आयोजित या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या प्रसंगी काँग्रेसचे सरचिटणीस रहीम कुरेशी उपस्थित होते. शिबिरात गोल्डन अवर हॉस्पिटलचे डॉ. अल्ताफ खान यांनी रुग्णांची तपासणी करून आवश्यक उपचार केले. तसेच रुग्णांना मोफत औषधांचेही वितरण करण्यात आले.

या आरोग्य शिबिराचा सुमारे 50 रुग्णांनी लाभ घेतला. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गोल्डन अवर हॉस्पिटलचे किशन सोनवणे, संजय महाजन, आरती भालेराव, शमीम कुरेशी, शहीन मुनव्वर खान आदींनी परिश्रम घेतले.