भुसावळ (प्रतिनिधी ) – अॅपे रिक्षा चोरी करणाऱ्या दोन आरोपींना भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाने चोरीच्या रिक्षासह ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे. आरोपींकडून सुमारे १ लाख ३० हजार रुपये किंमतीची अॅपे रिक्षा जप्त करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, फिर्यादी कैलास अशोक अग्रवाल (रा. शिवाजीनगर, भुसावळ) यांनी दिनांक ७ मे २०२६ रोजी त्यांची अॅपे रिक्षा चोरी झाल्याची फिर्याद भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे दिली होती. त्यानुसार गु.र.नं. २२४/२०२६ बी.एन.एस. कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना गुप्त बातमीदारामार्फत अज्ञात आरोपींबाबत माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ डी.बी. पथकाला आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार डी.बी. पथकाने संशयित आरोपी शेख अलाऊद्दीन उर्फ समीर शेख कुतुबुद्दीन (वय २३) व सैय्यद कासम सैय्यद खलील (वय २१, दोघे रा. आठवडे बाजार, रामपेठ, वरणगाव) यांना ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान आरोपींनी अॅपे रिक्षा चोरीची कबुली दिली. आरोपींकडून काळ्या रंगाची अॅपे रिक्षा क्रमांक MH-19-V-1761, इंजिन नं. R5H135511 व चेसीस नं. FGH275789 अशी १ लाख ३० हजार रुपये किंमतीची रिक्षा जप्त करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावीत व उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या नेतृत्वाखाली डी.बी. पथकातील पो.उपनिरीक्षक मंगेश जाधव, पोहेकॉ विजय नेरकर, कांतीलाल केदारे, सचिन चौधरी, चंद्रकांत रायपुरकर, महेंद्रसिंग पाटील, जावेद शहा, जीवन कापडे, दिलीप कोल्हे, योगेश माळी, भुषण चौधरी, प्रशांत सोनार, अमर अढाळे, अक्षय कोतकर व हर्षल महाजन यांनी ही कारवाई केली.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ. चंद्रकांत रायपुरकर करीत आहेत.


