भुसावळ(प्रतिनिधी ) – मेवाड भूषण महाराणा प्रताप यांच्या जयंती निमित्त भुसावळ येथील राजस्थानी समाजाच्या वतीने त्यांना उत्साहात अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला

.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जे.बी. कोटेचा यांनी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी महाराणा प्रताप यांच्या गौरवशाली जीवनावर प्रकाश टाकला आणि त्यांचा पराक्रम व स्वाभिमान आजही सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
याप्रसंगी निर्मल कोठारी,राधेश्याम लाहोटी,जयंतीलाल सुराणा,विनोद शर्मा,सत्यनारायण शर्मा,गौतम चोरिया,कांतीलाल चोरडीया,विशाल चोरडिया,रामवल्लभ झवर,प्रा.दिनेश राठी,संजय चांडक,चंद्रसिंग चौधरी,जितेंद्रसिंग चौधरी,विनोद मेहता यांच्यासह राजस्थानी समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


