मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – मुक्ताईनगर तालुक्यातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बळजबरीने अत्याचार करून तिचा नग्न व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी नराधम आरोपीविरुद्ध बलात्कार, पोक्सो आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, १८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास हरताळा शेत शिवारात आरोपी ईश्वर सिद्धार्थ वाघ (रा. मुक्ताईनगर, ह.मु. पुणे) याने पीडित मुलीला गाठले. तिला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. एवढ्यावरच न थांबता या नराधमाने पीडितेचा नग्न व्हिडिओ देखील तयार केला…आरोपीने ६ मे २०२६ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास आपल्या ‘ इन्स्टाग्राम आयडीवरून पीडितेचा अश्लील व्हिडिओ व्हायरल केला. या प्रकारामुळे पीडितेच्या कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला आहे. अखेर पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून ७ मे रोजी रात्री उशिरा मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.

घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले आणि पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. सपोनि राजेंद्र चाटे आणि पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


