साकरी येथे पंचायतराज अभियान समिती कडून पाहणी !


भुसावळ (प्रतिनिधी) – तालुक्यातील साकरी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत पंचायत समिती समुद्रपूर जिल्हा वर्धा येथील तपासणी पथकाने पाहणी केली

या समितीमध्ये सतीश टिचुकले गटविकास अधिकारी समुद्रपूर , अशोक गिद्देवार गटशिक्षणाधिकारी , एम एस डेहणकर कृषी अधिकारी , गणेश माने विस्तार अधिकारी पंचायत समिती , आर के जाधव विस्तार अधिकारी आरोग्य यांच्या तपासणी पथकाने दि.५ मे रोजी १० ते २ या कालावधीत साकरी ग्रामपंचायत येथे 20 टक्के तपासणी करण्यात आली .

समितीने ग्रामपंचायतीने अभियान कालावधीत केलेल्या वृक्ष लागवड , सीसीटीव्ही कॅमेरे , रेन वॉटर हार्वेस्टिंग , वाचनालय , व्यायाम शाळा , अंगणवाडी , जिल्हा परिषद शाळा , माध्यमिक विद्यालय,स्मशानभूमी तसेच अभियान कालावधीतील आयुष्यमान भारत कार्ड , रेन वॉटर हार्वेस्टिंग शोषखड्डे , घनकचरा व्यवस्थापनाचे कामे सांडपाणी व्यवस्थापन कामांची प्रत्यक्ष पाहणी केली व समाधान व्यक्त केले.

यावेळी गौतम वाढे विस्तार अधिकारी पंचायत समिती भुसावळ ,सुनील महाजन माजी सभापती पंचायत समिती भुसावळ , प्रशासक विनोद सोनवणे , उप प्रशासक रोशन पाटील , जितेंद्र चोपडे , किरण चोपडे सर्व ग्रामपंचायत सदस्य , सदस्या पदाधिकारी व मोहन पाटील ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.
यावेळी या अभियान पथकाने गावात ठिकठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली तसेच ग्रामस्थांशी चर्चा केली. साकरी गावातील सुखसुविधा पाहून पथकाने समाधान व्यक्त केले.