भुसावळ (प्रतिनिधी ) – जैन समाजासह इतर धर्मीयांमध्येही मोठ्या संख्येने अनुयायी असलेल्या थोर जैन साध्वी प.पू. प्रीती सुधाजी म.सा. यांनी संथारा व्रत ग्रहण केल्यानंतर दि. १ रोजी देवलोक गमन केले.

त्यांच्या स्मरणार्थ दि. ३ रोजी भुसावळ येथील जैन बांधवांच्या वतीने सुराणा साधना भवन येथे जपतप व गुणांनुवाद सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी त्यांना विनम्रपणे श्रद्धांजली अर्पण केली.
सभेला संघपती जयंतीलाल सुराणा, निर्मल कोठारी, रविंद्र निमाणी, अशोक सुराणा, सुरेशचंद कुमट, राजेश सुराणा, राजेश बाफना, जे. बी. कोटेचा, गल्लूदास छाजेड, संजय चोरडिया, महेंद्र कोठारी, अजय जैन, मुकेश चोपडा, अशोक डोशी, डॉ. मयूर चोरडिया, डॉ. प्रवीण चोरडिया, डॉ. सुदेश साखला, डॉ. वसंतलाल नहार, सुमित चोरडिया, विशाल चोरडिया, गौतम चोरडिया, विजय चोरडिया, कांतीलाल चोरडिया, विखबचंद चोरडिया, संजय कोटेचा, शिरीष नाहाटा, राजेंद्र मेहता, राजेश छाजेड, विनोद मेहता, जितेंद्र कोटेचा, डॉ. प्रशांत बजाज, प्रकाश बाबू जैन, भगवान जैन, शेखर बंब, सचिन कोटेचा, राजीव कोटेचा, संदीप देवडा, नितीन सुराणा, धर्मेंद्र शिषोदिया, उपेंद्र खिवसरा, संजय सुराणा, आय. जी. नहार, धरमचंद चोपडा, टमन्टू चोरडिया आदींसह अनेक भाविक उपस्थित होते.
ही माहिती जे. बी. कोटेचा, भुसावळ यांनी दिली.


