पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेनेतर्फे अन्नदान वाटप ;

भुसावळ (प्रतिनिधी )-  
महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व कँबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना भुसावळ  शहरात व तालुक्यात गोर गरीब जनतेला अन्नदान वाटप करण्यात आले.
महाराष्ट्रात आलेल्या कोविड 19 अश्या महामारीने गोरगरीब जनतेला उपासमारीची वेळ आलेली असुन युवासेना भुसावळ तालुका व शहर तर्फे महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व कँबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसा निमित्ताने  ८०% समाजकारण २०% राजकारण या हेतुने अन्नदान वाटपचा उपक्रम राबविण्यात आला आहे. अन्नदान वाटपचा कार्यक्रम युवासेना तालुकाप्रमुख  हेमंत ब-हाटे , युवासेना शहर प्रमुख सुरज पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील कु-हा पानाचे या गावातील सामाजिक कार्यकर्ते सचिन सोनार , उपतालुकाप्रमुख पवन बाक्से , उपशहरप्रमुख विकास पाटील महिला आघाडिच्या कविता कोळी, योगेश काळे ,किशोर धोबी ,सचिन पाटील ,गिरीश जंजाळकर, या सर्वांच्या अनमोल सहकार्यात पार पडला आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *