भुसावळ (प्रतिनिधी) –
५ जून २०२० वटपोर्णिमा व जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कोरोना व निसर्ग वादळ या पार्श्वभूमीवर आजची वटसावित्री पौर्णिमा शहरासह परिसरात झाड़े लावून पर्यावरण वाचवून तसेच मास्क व सॅनीटायझर सौभाग्याचे वाण म्हणून वाटून साजरी करण्यात आली.
कोरोनाच्या या युद्धात कोरोना समूळनष्ट करण्याकरीता फिजिकल डिस्टनसिंग,मास्क,सॅनीटायझर याचा वापर नियमित करून ही लढाई जिंकायची आहे म्हणून महिलांना मास्क व सॅनीटायझर सौभाग्याचे वाण म्हणून वाटप करण्यात आले .तसेच वटवृक्षाला दोरा न गुंढाळता वृक्षारोपण,संवर्धन व पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संकल्प सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सौ राजश्री नेवे यांचेसह शहरातील चक्रधर नगर येथील महिलांनी घेतला.
याप्रसंगी काळजी घ्या, सुरक्षित रहा व प्रशासनास सहकार्य करा, बाजारात गर्दि टाळा असे आवाहनही राजश्री नेवे यांनी केले.यावेळी राजश्री नेवे, माया चौधरी, लिना इंगळे, मनिषा राठौड, उषा राणे, जयश्री वाणी यांचेसह चक्रधर नगर परिसरातील महिला उपस्थित होत्या .



