भुसावळ (प्रतिनिधी) – येथील रहिवासी तथा ज्येष्ठ पत्रकार संजयसिंग चव्हाण यांचे सुपुत्र राणा ओमकारसिंग चव्हाण यांची ‘लाईफ फर्स्ट प्रायव्हेट लिमिटेड’ (Life First Pvt. Ltd.) या नामांकित कंपनीमध्ये वरिष्ठ व्यवस्थापक या पदावर, ‘हेड ऑफ ईएचएस’ (Environmental Health and Safety) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

आपल्या मुलाने कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर मिळवलेल्या या यशाबद्दल वडील संजयसिंग चव्हाण यांनी आनंद व्यक्त केला. “माझा मुलगा नेतृत्वाच्या भूमिकेत पाहताना आणि त्याच्या कष्टाचे चीज होताना पाहून मला अत्यंत समाधान वाटते,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
राणा चव्हाण यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून, या उल्लेखनीय यशाबद्दल कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण असून, विविध स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मित्रपरिवार, नातेवाईक आणि सहकाऱ्यांकडून मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या जात आहेत.


