भुसावळ (प्रतिनिधी)) – भुसावळ रेल्वे विभागीय कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती दिनांक १५ एप्रिल २०२६ रोजी श्रद्धा व उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व अभिवादनाने करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक कार्मिक अधिकारी सुरेंद्र हिवराळे यांनी केले. यावेळी अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (प्रशासन) सुनील कुमार सुमन, अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (तांत्रिक) एम. के. मीना तसेच सीआरएमएस, एनआरएमयू आणि एससी/एसटी व ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींनी डॉ. आंबेडकर यांच्या जीवनकार्य व योगदानाबाबत आपले विचार मांडले.
या कार्यक्रमास विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी तसेच युनियन व संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



