भुसावळ(प्रतिनिधी)- तालुकातील निंभोरा बुद्रुक येथे विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने जिल्हा परिषद शाळा येथील पहिली पासून चौथी च्या विद्यार्थी यांना शालेय शिक्षण साहित्य मोफत वाटप करण्यात आले.
सदर उपक्रम गेली आठ वर्षांपासून भीमसैनिक संतोष इंगळे राबवित आहेत. यावेळी गावातील नागरिक मध्ये मनसाराम कोळी , रमेश शिरसाट, विपुल धांडे, पत्रकार प्रकाश सरदार, दिनेश इखारे,रवी गाढे, जयवंता इंगळे, कल्पना प्रधान, यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व कल्पना प्रधान यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेतील शिक्षिकानी यांनी केले




