सेल्फ डिफेन्स स्पोर्ट्स असोसिएशनच्या खेळाडूंचा चेन्नईत डंका: बाॅक्सिंग स्पर्धेत आरुषी सावकारे व ममता कंवर यांना घवघवीत यश:

भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील सेल्फ डिफेन्स स्पोर्ट्स असोसिएशन च्या खेळाडूंनी चेन्नई येथे ३० मार्च रोजी झालेल्या खेलो इंडिया नॅशनल किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन करून भुसावळ शहराचे नाव लौकिकात भर आहे.किक बाॅक्सिंग स्पर्धेत आरुषी सावकारे हिने सिल्वर मेडल तर ममता कंवर हिने ब्रांझ मेडल पटकावले आहे.
सेल्फ डिफेन्स स्पोर्ट्स असोसिएशन चे प्रशिक्षक भिमज्योत शेजवळ सुमेध शेजवळ व राकेश सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली किक बाॅक्सिंग ज्युडो कराटे आदी प्रशिक्षण मुलामुलींना दिले जात आहे. भिमज्योत शेजवळ हे गेल्या ३८ वर्षापासून विनामूल्य मुलामुलींना किक बाॅक्सिंगचे प्रशिक्षण देत आहेत. चेन्नई येथे नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया नॅशनल किक बाॅक्सिंग स्पर्धेत आरुषी सावकारे हिने सिल्व्हर मेडल तर ममता कंवर हिने ब्रांझ मेडल पटकावले आहे. विजेत्या स्पर्धकांना सुमेध शेजवळ राकेश सपकाळे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्यांची मेहनत व स्पर्धकांची जिद्द यामुळे यश मिळाले असल्याचे
बाॅक्सिंग प्रशिक्षक बाळा मोरे यांनी सांगितले आहे.
पुर्वीच्या काळी, स्त्रियांना फक्त चूल आणि मूल एवढेच माहिती होते मात्र विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे व सावित्रीबाई फुले यांनी दिलेल्या शिक्षणामुळे महिलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी करण्याची संधी मिळाली आहे. आम्हाला मिळालेल्या यशाचे पूर्ण श्रेय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले , छत्रपती शिवाजी महाराज तसेच आमचे प्रशिक्षक भिमज्योत शेजवळ सुमेध शेजवळ व राज सपकाळे यांना असल्याचे सिल्वर मेडल विजेत्या आरुषी सावकारे यांनी सांगितले .
किक बाॅक्सिंग स्पर्धेत विजय संपादन केलेल्या स्पर्धकांचे व प्रशिक्षकाचे भुसावळ रेल्वे स्थानकावर आगमन होताच त्यांचे पेढे भरवून पुष्पहार देऊन ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. रेल्वे स्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला भिमज्योत शेजवळ आरुषी सावकारे व ममता कंवर यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. तर आरुषी सावकारे हिने रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना दिली. यावेळी बाॅक्सिंगचे प्रशिक्षक नरेंद्र उर्फ बाळा मोरे रमेश साळवे नगरसेविका अर्चना सातदिवे विलास सातदिवे शांताराम जाधव विजय साळवे सरजु तायडे संगिता भामरे पत्रकार सुनील आराक गणेश सपकाळे संगिता शेजवळ दामिनी शेजवळ संगिता सावकारे रुपेश गायकवाड धनराज बाविस्कर
प्रसेनजित खरात अजय शेळके राजदीप शेजवळ राम जोहरे दिपाली शेजवळ रेखा शेजवळ आदी
उपस्थित होते.