भुसावळ (प्रतिनिधी ) – राज्यातील वीज निर्मिती क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी लिमिटेड (महाजेनको) मध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा मोठा फेरबदल करण्यात आला आहे. प्रशासकीय कारणास्तव जारी आदेश क्रमांक २८२४नुसार मुख्य अभियंता व उपमुख्य अभियंता स्तरावरील सहा अधिकाऱ्यांची विविध प्रकल्पांमध्ये पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे.

या बदल्यांमुळे कोराडी, खापरखेडा, भुसावळ तसेच मुंबई मुख्यालयातील महत्त्वाच्या पदांवर नव्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या असून, प्रकल्प व्यवस्थापनात अधिक गतिमानता येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महत्त्वाच्या बदल्या:
- राजेश मोराळे : टीपीएस भुसावळ → कोराडी ट्रेनिंग सेंटर
- विराज चौधरी : मुंबई मुख्यालय → टीपीएस भुसावळ (मुख्य अभियंता)
- विलास मोतघरे : टीपीएस कोराडी → कोराडी प्रोजेक्ट
- विवेक रोकडे : कोराडी प्रोजेक्ट → टीपीएस खापरखेडा (अतिरिक्त प्रभारी मुख्य अभियंता, Civil-II)
- गिरीश कुमारवार : टीपीएस खापरखेडा → मुंबई मुख्यालय (अतिरिक्त प्रभारी संचालक, O&M-I)
- सुधीर राणे : टीपीएस कोराडी येथेच अतिरिक्त प्रभारी मुख्य अभियंता
महाजेनकोने संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ नवीन ठिकाणी कार्यभार स्वीकारण्याचे निर्देश दिले आहेत. बदलीसंदर्भातील प्रवास भत्ता, जॉइनिंग टाइम, वेतन व इतर सुविधा कंपनीच्या नियमांनुसार दिल्या जाणार असून, रिलीव्हिंग व जॉइनिंग अहवाल सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
महाजेनकोकडून वेळोवेळी अशा प्रशासकीय बदल्या करून प्रकल्पांमध्ये कुशल मनुष्यबळाचे योग्य नियोजन केले जाते. या नव्या फेरबदलामुळे वीज निर्मिती प्रकल्पांच्या कार्यक्षमतेत आणि निर्णय प्रक्रियेत अधिक वेग येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.


