आर्सेनिक अल्बम ३० च्या १ हजार बाटल्या वाटप ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
-पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या २९५ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र धनगर समाज प्रणित मल्हार सेनेतर्फे भुसावळ तालुक्यातील विविध गावात आरोग्यवर्धक गोळ्यांचे वाटप करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
मल्हार सेना भुसावळ शहर व तालुका यांच्यावतीने आज दिनांक ३१ मे रोजी आर्सेनिक अल्बम ३० च्या १ हजार बाटल्या वाटप करण्यात आल्या.
दरवर्षी ३१ मे रोजी संपूर्ण भारतात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती समारंभपूर्वक, जल्लोषात व मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यावर्षी कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरीता लॉकडाऊन सुरु आहे. यामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती सार्वजनिकरित्या साजरी न करता सामाजिक हितार्थ उपक्रम राबविण्‍यात आला . यानिमित्त नागरिकांच्या आरोग्यासाठी ३० हजार रुपयांचा खर्च करण्यात येवून आर्सेनिक ३० गोळ्या वाटप करण्यात आल्या.यात ग्रामीण भागात साकेगाव, वांजोळा, सुनसगाव, कुऱ्हा(पानाचे) व इतर गावात गोळ्यांचे वाटप करून समाजहित जोपासण्यात आले. नागरिकांनी भीती न बाळगता या परिस्थितीला सामोरे जायचे आहे मात्र खबरदारी काळजी व प्रतिबंधात्मक उपाय व शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करायचे आहे याकरीता घरात रहा सुरक्षित रहा असा संदेश गोळ्याचे वाटप करतांना मल्हार सेना भुसावळ शहराध्यक्ष विशाल प्रल्हाद ठोके यांनी दिला . यावेळी भूषण ठोके, दिनेश झटकार, स्वप्निल सावळे, यांनी परिश्रम घेतले तर जेष्ठ कार्यकर्ते वैद्य रघुनाथअप्पा सोनवणे, नामदेव सावळे, विश्वनाथ धनके यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *