शहरातील कोरोना विषाणूने प्रभावित परिसरातील नागरिकांचे स्वॅब घ्या – शिशिर जावळे

भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शनिवारी प्रोफेसर कॉलनी फालक नगरातील, कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने शनिवार पर्यंत शहरात मृतांची संख्या २४ झाली आहे. व एकूण रुग्ण संख्या १४५ झाली असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचे दिसते. त्यामुळे प्रशासन सुद्धा हादरून गेलेले आहे.यात प्रभाग २२ मधील प्रोफेसर कॉलनीतील वृद्ध मयतझालेला आहे. तसेच शनिवारी शहरात आलेल्या अहवालात याच प्रभागातील आनंदनगर, प्रोफेसर कॉलनी, कस्तुरी नगर, भागातील पॉझिटिव्ह यांचा समावेश आहे. त्यामुळे या प्रभागांमध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेला आहे. या परिसरातील या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ना प्रशासनाने कॉरनटाईन केलेल आहे.
सदर प्रभाग क्रमांक २२ मधील सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी तसेच या प्रभागा आढळून आलेल्या वरील कोरोना पॉझिटिव रुग्णांच्या परिसरातील सर्व नागरिकांचे त्वरित युद्धपातळीवर आरोग्य तपासणी करून त्यांचे सर्वांचे स्वॅब घेण्यात यावे. या प्रभागातील सर्व प्रभावित परिसर त्वरित सील करण्यात यावेत. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व अध्यक्ष
साई निर्मल फाउंडेशनचे अध्यक्ष
शिशिर दिनकर जावळे
यांनी डॉ. अविनाश ढाकणे जिल्हाधिकारी जळगाव, श्रीमती करुणा डहाळे मुख्याधिकारी भुसावळ यांच्याकडे मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *