भुसावळ (प्रतिनिधी )-
-सुमारे एक वर्षा पासून फरार व दोन वर्षांकरीता हद्दपार असलेल्या आरोपीला भुसावळ शहर पोलीसांनी अटक केली आहे.
भुसावळ शहर पोलीस ठाण्यात भाग ५, गुरनं ९६/२०१९ प्रमाणे भादवि १४३,१४४,१४७,४२७ प्रमाणे स्थानिक राहुल नगरातील संशयित आरोपी मुकेश प्रकाश भालेराव (वय-२५)हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. दरम्यान त्यालाच विविध गुन्ह्याच्या कलमाखाली २ वर्षाकरीत हद्दपार करण्यात आले आहे. संशयित आरोपी हा कुख्यात गुंड असून त्यांच्या विरोधात भुसावळ शहर,भुसावळ तालुका, फैजपूर, शनिपेठ पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत.
उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड,पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलीस नाईक रविंद्र बिऱ्हाडे,पोकॉ.श्रीकृष्ण देशमुख,प्रशांत परदेशी यांनी ताब्यात घेऊन शहर पोलीसांच्या ताब्यात दिले.



