गोंदिया स्थानकावर ट्रॅक कामामुळे काही एक्सप्रेस गाड्या रद्द

भुसावळ (प्रतिनिधी ) – दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर विभागांतर्गत गोंदिया रेल्वे स्थानक येथे महत्त्वाच्या ट्रॅक दुरुस्ती कामामुळे काही एक्सप्रेस गाड्या तात्पुरत्या रद्द करण्यात आल्या आहेत. प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर वॉशेबल एप्रन काढून त्याऐवजी बॅलेस्टेड ट्रॅक टाकण्याचे काम हाती घेण्यात येणार असून, यासाठी ब्लॉक घेतला जाणार आहे.

या कामाचा परिणाम म्हणून भुसावळ विभागातून धावणाऱ्या पुढील गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत:

  • गाडी क्रमांक 18030 शालीमार – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस : 04 एप्रिल 2026 ते 24 एप्रिल 2026
  • गाडी क्रमांक 18029 लोकमान्य टिळक टर्मिनस – शालीमार एक्सप्रेस : 06 एप्रिल 2026 ते 26 एप्रिल 2026
  • गाडी क्रमांक 12101 लोकमान्य टिळक टर्मिनस – शालीमार एक्सप्रेस (सुपरफास्ट) : 04 एप्रिल 2026 ते 21 एप्रिल 2026
  • गाडी क्रमांक 12102 शालीमार – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस (सुपरफास्ट) : 06 एप्रिल 2026 ते 23 एप्रिल 2026

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, प्रवासाचे नियोजन करताना या बदलांची नोंद घ्यावी. अद्ययावत माहितीसाठी रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट, मोबाईल ॲप किंवा जवळच्या स्थानकावर संपर्क साधावा.

प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगीर व्यक्त केली असून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.