भुसावळात पुरातन श्रीराम मंदिरासह ठिकठिकाणी रामजन्मोत्सव उत्साहात साजरा : भाविकांची दर्शनासाठी रिघ :

भुसावळ (प्रतिनिधी ) -: येथिल पुरातन श्रीराम मंदिरात रामजन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. गुढीपाडवा दि १९ ते २५ दरम्यान श्रीरामनवमी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले . यात सकाळी ६ ते ९ वा अभिषेक व पूजन करण्यात तर दुपारी भजन व प्रवचन तसेच रामायण व्याख्यानमाला झाल्या .

श्रीराम नवमी निमीत्त पुरातन श्रीराम मंदिरात भाविकांची गर्दी उसळली होती. मंदिराच्या पुजारी सरीताताई चौक यांनी उत्कृष्ट अशी आरास व चोख व्यवस्था केली.

या वेळी धनश्री जोशी,विशाखा नाईक,कविता नाईक,मनिषा इखे, रुपाली महाजन,स्मिता दुसाने,निर्मला चौधरी,मंगला कुळकर्णी,सुनिता कुळकर्णी,वर्षा लोखंडे,मेघा कुरकुरे, सविता चौक,प्राजक्ता चौक,निशा चौक,लक्ष्मी पाटील,भारती पाटील, मालती पाटील,विमल कोटेचा,अरुणा अग्रवाल,राधेश्याम लाहोटी,जे बी कोटेचा,गोपाल चांडक,विनोद शर्मा,अनुप अग्रवाल, विणायक चौक,दिलीप लोंढे,सुभाष शिरसाळे, सत्यनारायण शर्मा, हेमंत बऱ्हाटे,रामचंद्र गचके,रमाकांत मंत्री सांच्यासह विश्वहिंदु परिषदचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

फोटो कॅप्शन – भुसावळातील पुरातन श्रीराम मंदिरात रामनवमीनिमित्त भाविकांची दर्शनासाठी झालेली गर्दी.