भुसावळ (प्रतिनिधी): ताप्ती लेडीज योगा क्लब आणि स्वामिनी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चैत्र गौरी नवरात्रीनिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम 31 मार्च 2026 रोजी दुपारी 4 वाजता नाभिक संघ, भुसावळ येथे पार पडणार आहे.

या कार्यक्रमांतर्गत महिलांसाठी वेशभूषा स्पर्धा, हरभऱ्याची डाळ आणि कैरीपासून बनवलेल्या पाककृतींची स्पर्धा तसेच विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. याशिवाय उपस्थितांसाठी आकर्षक लकी ड्रॉचेही आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धांमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या महिलांनी आपली नावे आयोजकांकडे नोंदवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. नोंदणीसाठी अध्यक्ष प्रियंका चौधरी (7620839789), डॉ. भाग्यश्री भंगाळे (9423975704), विजया निकम (9403988545) आणि स्वाती गाजरे (8329437669) यांच्याशी संपर्क साधावा.
या कार्यक्रमामुळे महिलांना आपल्या कौशल्यांचे प्रदर्शन करण्याची तसेच सांस्कृतिक वातावरणात आनंद घेण्याची संधी मिळणार आहे.


