स्नेहयात्री करंडक • दोनदिवसीय राज्यस्तरीय स्पर्धेतून मिळाली नाट्य मेजवानी

स्वामी नाट्यांगणची ‘भ्रमरात्र’ प्रथम, ‘हमको हिंदी नही आती’ एकांकिका ठरली द्वितीय

भुसावळ (प्रतिनिधी )

स्नेहयात्री प्रतिष्ठानतर्फे येथील श्रीकृष्णचंद्र सभागृहात दोन दिक्मीय राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत स्वामी नाट्यांगण, डोंबिवली संस्थेची ‘भ्रमरात्र’ने पहिला, तर ज्ञानसाधना नाट्य परिवार, ठाणे संस्थेची ‘हमको हिंदी नहीं आती’ने द्वितीय आणि तृतीय पारितोषिक तळ्यात मळ्यात या अंधेरी (मुंबई) च्या संधाने प्राप्त केले, शनिधार व रविवार असे दोन दिवस झालेल्या या स्पर्धेचा निकाल रात्री उशीरा जाहीर झाला.

स्व. राजकुमारी मनोहर जाधवानी सभागृह आणि स्व.डॉ. उमेश खानापूरकन स्मृती मंचावर संपन्न झालेल्या बक्षीस वितरण समारंभात उपस्थित मनोहर जाधवानी, उमेश नेमाडे, प्रा. डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, समीर पाटील, जय निमाणी, डॉ. समीर खानापूरकर, सुषमा डॉ. नितीन खानापूरकर दावतभक्त, संदीप सुरवाडे, धनश्री एकरे, मुकेश खपली या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. समारोप प्रसंगी डॉ. नितीन दावतभक्त, डॉ. जान्हवी पाटील, संदीप जोशी प्रवीण गांधेले,

पुरुष अभिनयात विजय गंगण प्रथम

पुरुष अभिनयासाठीचा स्व. डॉ. उषा दावलभक्त स्मृती पुरस्कार प्रथम क्रमांक आलोकच्या भूमिकेतील विजय गंगण (भ्रम रात्र), द्वितीय क्रमांक – अनिरुद्धच्या भूमिकेतील योगेश कदम (तळ्यात मळ्यात), तृतीय क्रमाक दिग्दर्शकाच्या भूमिकेतील साहिल कदम (हम को हिंदी नहीं आती) यांनी पटकावला, तर कुंदन तावडे यांना लक्षवेधी अभिनेता म्हणून पारितोषिक देण्यात आले.

नेपथ्यासाठी दोघांना पुरस्कार

नेपथ्यासाठी स्व सुमन पाटील स्मृती पुरस्कार प्रथम क्रमांक हर्षदा मराठे, सागर खैरनार (एका रात्रीचा गर्भ), द्वितीय व्ही, एम. थिएटर (भ्रमरात्र), तृतीय-विनय गीडे (तळ्यात मळ्यात) प्रकाश योजनेसाठी स्व. शांता प्रलाद जावळे स्मृती पुरस्कार प्रथम राजेश शिंदे भ्रमरात्र), द्वितीय – गणेश शेळके (एका रात्रीचा गर्भ), शाम चकाण (तळ्यात मळ्यात).

असे आहेत विजेते

क्रमांक – माधवीच्या भूमिकेतील स्त्री अभिनयात डॉ. यशश्री कंटक प्रथम स्वी अभिनयासाठी मुक्ता लेकुरवाळे सन्मानार्थ पुरस्कार प्रथम

डॉ. यशश्री कंटक (तळ्यात मळ्यात), द्वितीय क्रमांक – नेहाच्या भूमिकेतील वैष्णवी दळवी (पहिली रात्र), तृतीय क्रमांक – मुलगीच्या भूमिकेतील श्रावणी मोरे (पाकळ्या), लक्षवेधी अभिनय म्हणून काजल आटकळे यांना पारितोषिक देण्यात आले.

मुकेश खपली, रोहिणी तायडे, कुणाल बावीस्कर, हर्षवर्धन बाविस्कर यांनी एकापेक्षा एक दर्जेदार गाणी सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. सूत्रसंचालन संजीवनी यावलकर यांनी केले. या दोन दिवसीय एकांकिका स्पर्धेला गणेश लिमकर (अहिल्यानगर), मुकेश काळे (कल्याण) यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. बक्षीस वितरण समारंभाची सुत्रे प्रा. गिरीश कुलकर्णी यांनी सांभाळले. महोत्सवाच्या यशस्वितेसाठी प्रकल्प प्रमुख नारायण माळी, समीर पाटील, मुकेश खपली, अक्षय

स्व. लालचंदजी लखीचंदनी निमाणी सांधिक प्रथम क्रमांकः भ्रम रात्र (स्वामी नाटांगण, डोंबिवली), स्व, रुक्मिणी पांडुरंग माधवपूरकर मांधिक द्वितीय क्रमांक हमको हिंदी नाहीं आती (ज्ञानसाधना, ठाणे), स्व. कलाबाई देविदास ठाकरे साधिक तृतीय क्रमांक: तळ्यात मळ्यात (कलासक्त, अंधेरी). दिग्दर्शनासाठी स्व. अशोक कुलकर्णी स्मृती पुरस्कार प्रथम क्रमांक – प्रथमेश देवकुळे (भ्रम रात्र), द्वितीय क्रमांक – साईराम घोलप (हमको हिंदी नहीं आती), तृतीय क्रमांक- योगेश कदम (तळ्यात मळयात). या सर्वांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला,

माधवपूरकर, धनराज कुंवर, रोहन माळी, हरीश कोळी, दिनेश ठाकरे, संजय यावलकर, श्रीकांत लोहार, खुशाल निंबाळे, रमाकांत भालेराव, राजेंद्र जावळेंनी सहकार्य केले. फोटो ओळ -स्नेहयात्री करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत विजेत्या संघासोबत मान्यवर व आयोजक