भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील सकल जैन समाजाची महत्त्वपूर्ण बैठक दिगंबर जैन मंदिर, आठवडे बाजार येथे उत्साहात पार पडली. आगामी 30 मार्च 2026 रोजी होणाऱ्या भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सवाच्या नियोजनासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

बैठकीत सर्वानुमते श्री रमेश भिकाजी अन्नदाते यांची श्री भगवान 1008 महावीर जन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी श्री विशाल सुगमचंद चोरडिया आणि श्री संजय स्वरूपचंद चोरडिया यांची निवड करण्यात आली.
तसेच, कोषाध्यक्षपदी श्री चंद्रकांत नथुजी रत्नपारखी, श्री राजेंद्र पन्नालाल मेहता आणि श्री सोमेश सुनील साखला यांची निवड झाली. प्रसिद्धी प्रमुख म्हणून श्री रमाकांतजी घोडके यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली.
या बैठकीस मागील समितीचे श्री गौतम चोरडिया उपस्थित होते. तसेच पंचकल्याणक समितीचे अध्यक्ष श्री शेखर बाबूजी जैन, उपाध्यक्ष श्री गजेंद्र रुईकर, दिगंबर जैन मंदिराचे चेअरमन, ट्रस्टी बोर्ड सदस्य आणि सकल जैन समाजातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
बैठकीत महावीर जन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरा करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.


