भुसावळात रंगणार स्नेहयात्री करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा :

मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूर, नाशिक,जळगावसह राज्यातील एकूण १३ संघांचा सहभाग :

भुसावळ (प्रतिनिधी )- येथील स्नेहयात्री प्रतिष्ठान,भुसावळ आयोजीत ‘स्नेहयात्री करंडक’ या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेला शनिवार, २१ मार्च पासून दुपारी ३ वाजेपासून प्रारंभ होत आहे. दि. २१ आणि २२ मार्च या दोन दिवसात नाट्य रसिकांना तब्बल १३ नाटकांची मेजवानी मिळणार आहे.

स्व. लालचंदजी लखिचंद निमाणी सभागृह, कृष्णचंद्र सभागृहात शनिवार आणि रविवार या दोन दिवसात मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूर, नाशिक आणि जळगाव येथील एकूण १३ नाट्यसंस्था स्व.डॉ. उमेश खानापूरकर स्मृतीमंचावर आपल्या नाट्य कलाकृती सादर करतील.

विजेत्या एकांकिकांना विविध पुरस्कार
विजयी संघांना रविंद्र निमाणी यांच्याकडून स्व. लालचंद लखीचंद निमाणी स्मृती सांघिक प्रथम स्मृती पुरस्कार, अक्षय माधवपूरकर यांच्याकडून गुरुवर्य स्व. रुक्मिणी माधवपूरकर स्मृति सांघिक व्‍दितीय पुरस्कार. विवेक ठाकरे यांच्याकडून स्व. कलाबाई देविदास ठाकरे स्मृती सांघिक तृतीय पुरस्कार, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी स्व. अशोक कुलकर्णी स्मृती पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पुरुष अभिनयासाठी स्व. डॉ. उषा माधव दावलभक्त स्मृती पुरस्कार, सर्वोत्कृष्ट स्त्री अभिनयासाठी स्व. मुक्ता दिनकर लेकुरवाळे स्मृती पुरस्कार, सर्वोत्कृष्ट नेपथ्यासाठी स्व. सुमन भाईदास पाटील स्मृती पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट प्रकाश योजनेसाठी स्व. शांताबाई प्रल्हाद जावळे स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

स्पर्धांचे वेळापत्रक पुढील प्रमाणे

शनिवार, २१ मार्च रोजी दुपारी ३ वाजता – कान्हदेश कला मंचख चोपडा संस्थेचे ‘एका रात्रीचा गर्भ’,संध्याकाळी ५ वाजता – स्पॉटलाईट, नाशिकचे ‘दो लफ्जो की कहानी’,संध्याकाळी ६ वाजता – नाट्यरंग, जळगावचे ‘गाईड’,संध्याकाळी ७ वाजता – इन्फीनिटी, पुणे संस्थेचे ‘पुंडलिक वरदा’,रात्री ८ वाजता – व्‍हाईट एलिफन्ट संस्था, डोंबिवलीचे ‘ट्युलिप’

रविवार, २४ मार्च रोजी होणाऱ्या एकांकिका

सकाळी ९.३० वाजता – उत्कर्ष कलाविष्कार, भुसावळचे ‘लॉक-अनलॉक’,सकाळी १०.३० वाजता – वैभवदीप, सोलापूर संस्थेचे ‘प्रेम की यातना’ ,दुपारी ११.३० वाजता – उत्कर्ष कलाविष्कार, भुसावळचे ‘माणूसघर’,दुपारी १.३० वाजता – नक्षत्र कलामंच, मुंबईचे ‘पाकळ्या’ दुपारी २.३० वाजता – उत्तुंग मंडळ, नागपूरचे ‘सोडचिठ्ठी’,दुपारी ३. ३० वाजता – कलासक्त, अंधेरी संस्थेचे ‘तळ्यात-मळ्यात’, संध्याकाळी ५ वाजता – ज्ञानसाधना, ठाणे या संस्थेचे ‘हमको हिंदी नही आती’, संध्याकाळी ६ वाजता – स्वामी नाट्यांगण, डोंबिवली या संस्थेचे ‘लेटर बॉक्स नं. १४३’अशा एकूण १३ एकांकिका दोन दिवसात सादर होतील.

संगीत संध्या कार्यक्रमांनी होणार समारोप
स्पर्धेच्या समोराप प्रसंगी संध्याकाळी ७ वाजता ‘संगीत संध्या’ हा चित्रपटगीतांचा बहारदार कार्यक्रम सादर होईल.या कार्यक्रमानंतर लगेचच मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होईल. सदर स्पर्धेसाठी रविंद्र निमाणी, चंद्रशेखर अग्रवाल, युवराज लोणारी, पिंटूभाऊ कोठारी, संदिप सुरवाडे, आनंद फडके, केदार ओक, मनोहर जाधवानी, डॉ. समीर खानापूरकर, डॉ. नितिन दावलभक्त यांचे, समीर पाटील यांचे अनमोल सहकार्य लाभले आहे. दोन दिवसात तब्बल १३ नाटकांची मेजवानी रसिकांना लाभणार आहे,

कार्यक्रमाच्या यशस्वतीतेसाठी संस्थेचे मुकेश खपली, प्रा.डॉ. गिरीष कुलकर्णी, प्रा.डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, संस्थेचे सचिव विश्वजीत घुले, राजेंद्र जावळे, हरीश कोळी, अक्षय माधवपूरकर, संजय यावलकर, संजीवनी यावलकर, आदर्श पंडा, धनराज कुंवर, रामचंद्र डहाके, खुशाल निंबाळे, प्रदिप चौधरी, दिनेश ठाकरे, बाळा बावीस्कर, सनी बावीस्कर, राजेश पाटील इ. परिश्रम घेत आहेत.

” सर्व नाटकांना प्रेक्षकांसाठी प्रवेश नि:शुल्क असणार आहे. भुसावळच्या सांस्कृतिक चळवळीतील सर्वात भव्‍य अशा राज्यस्तरीय स्पर्धेच्या निमित्ताने शहरातील नाट्यचळवळ वृध्दींगत व्‍हावी यासाठी स्नेहयात्री प्रतिष्ठान सातत्याने प्रयत्नशील असते ”-नारायण माळी. स्नेहयात्री करंडक स्पर्धेचे प्रकल्प प्रमुख