भुसावळ येथे पंचकल्याणक महोत्सवाचे आयोजन :

भुसावळ (प्रतिनिधी ) येथे दिगंबर जैन मंदिर संस्थेच्या वतीने भव्य पंचकल्याणक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा धार्मिक सोहळा 28 मार्च ते 3 एप्रिल 2026 दरम्यान बियाणी स्कूल भुसावल येथे संपन्न होणार आहे.

या महोत्सवात 24 पिच्छिधारी संतांचा महासानिध्य लाभणार असून, विभव सागरजी महाराज (20 पिच्छिका), स्वात्मनंदीजी महाराज (2 पिच्छिका) तसेच आस्तिक्य सागरजी महाराज (2 पिच्छिका) यांचा प्रमुख सहभाग असणार आहे.

महोत्सवाची सुरुवात 28 मार्च रोजी घटयात्रा, रथफेरी, ध्वजारोहण आणि गर्भकल्याणक (पूर्वरूप) यांनी होईल. 29 मार्च रोजी गर्भकल्याणक (उत्तररूप), 30 मार्च रोजी जन्मकल्याणक, 31 मार्च रोजी तपकल्याणक, 1 एप्रिल रोजी ज्ञानकल्याणक तर 2 एप्रिल रोजी मोक्षकल्याणक व रथफेरीचे आयोजन करण्यात आले आहे.

संपूर्ण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण YouTube वरील “विभव वाणी” या चॅनलवरून करण्यात येणार आहे. दिगंबर जैन मंदिर समूहाच्या माध्यमातून दररोज अपडेट्स देखील उपलब्ध होणार आहेत.

भक्तांनी या पवित्र धार्मिक सोहळ्यात सहभागी होऊन धर्मलाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.