भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ नगरपरिषद यांच्या वतीने शहरातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मंगळवार, दि. 17 मार्च 2026 रोजी बेरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात सुमारे 400 युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे.

हा मेळावा नगराध्यक्षा गायत्री चेतन भंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे. महिला दिनानिमित्त त्यांनी केलेल्या घोषणेनुसार या रोजगार उपक्रमात 50 टक्के संधी महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे.
भुसावळ शहरातील सर्व बेरोजगार युवक, युवती तसेच महिलांनी मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित राहून आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रतींसह आपले नाव नोंदवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या मेळाव्यामुळे शहरातील बेरोजगारांना रोजगार मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे.
हा मेळावा भुसावळ येथील संतोषीमाता हॉल, प्रोफेसर कॉलनी येथे सकाळी 11 वाजता सुरू होणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून माजी मंत्री एकनाथ खडसे, आमदार संतोष चौधरी, नगराध्यक्षा गायत्री चेतन भंगाळे, गटनेते सचिन चौधरी, तसेच नगरसेवक, नगरपरिषद कर्मचारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.


