जळगाव (प्रतिनिधी ) : एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरवाढी विरोधात तसेच गॅस पुरवठा सुरळीत होत नसल्याच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवार (दि. १७ मार्च) रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे.

महायुती सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली असून पुरवठाही सुरळीत होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद झाल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील सुमारे ४० टक्के हॉटेल व्यवसाय बंद पडण्याच्या स्थितीत असल्याचे सांगण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे आणि तालुका प्रमुख प्रमोद घुगे यांनी केले आहे.


