भुसावळ (प्रतिनिधी) : येथील जुने बालाजी मंदिरात माहेश्वरी व अग्रवाल समाजाच्या वतीने गणगौर उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने माहेश्वरी समाजाच्या वतीने बालाजी मंदिरापासून गणगौरची पारंपरिक शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिलांमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणाने भारून गेला.

शोभायात्रेनंतर मंदिर परिसरात गणगौर पूजन व विविध धार्मिक विधी पार पडले. महिलांनी गणगौर मातेची भक्तिभावाने पूजा करत मंगल गीते गायली. कार्यक्रमामुळे समाजात एकात्मता व सांस्कृतिक परंपरेचे जतन होत असल्याचे यावेळी व्यक्त करण्यात आले.
यावेळी डॉ. संगीता बियाणी, स्मिता बियाणी, राधा झवर, शितल भराडिया, राखी भरडिया, दिपा झवर, चित्रा झवर, आभा दरगड, अल्पना सोनी, शशिकला लाहोटी, राजेश्री लढ्ढा, संगीता चांडक, प्रिती हेडा, मेघा आगीवाल, बिना अग्रवाल, रेखा अग्रवाल, प्रिया अग्रवाल, नेहा अग्रवाल, दिपीका अग्रवाल, विशाखा अग्रवाल व निकिता अग्रवाल आदी महिला उपस्थित होत्या. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
फोटो कॅप्शन : भुसावळ येथील जुने बालाजी मंदिरापासून काढण्यात आलेल्या गणगौर शोभायात्रेत सहभागी झालेल्या माहेश्वरी व अग्रवाल समाजातील महिला. डॉ.संगिता बियाणी,स्मिता बियाणी,राधा झवर,शितल भराडिया,राखी भरडिया,दिपा झवर,चित्रा झवर,आभा दरगड,अल्पना सोनी.
फोटो कॅप्शन – भुसावळ येथे गणगौर कार्यक्रमात गणगौर घेतलेले डॉ.संगिता बियाणी,स्मिता बियाणी,राधा झवर,शितल भराडिया,राखी भरडिया,दिपा झवर,चित्रा झवर,आभा दरगड,अल्पना सोनी.


