भुसावळ नगरपरिषदेचा उपक्रम : महिला दिनानिमित्त महिलांसाठी आरोग्य व योजनांवर मार्गदर्शन :

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ नगरपरिषद यांच्या वतीने जागतिक महिला दिन निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दि. 08 मार्च 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता संतोषी माता हॉल येथे आयोजित करण्यात येणार आहे. कार्यक्रमास जिल्हाधिकारी तसेच जि.प. जळगावचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

कार्यक्रमामध्ये महिलांच्या आरोग्याबाबत विशेष मार्गदर्शनासाठी “आरोग्यावर बोलू काही” या विषयावर डॉ. श्रद्धा चांडक मार्गदर्शन करणार आहेत. तसेच महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय कल्याणकारी योजनांविषयी संबंधित क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींकडून माहिती देण्यात येणार आहे.

यावेळी नाट्य अभिनेत्री मंजू भिडे तसेच इतर मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. तरी या कार्यक्रमास महिलांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भुसावळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांनी केले आहे.