भुसावळ प्रतिनिधी रेल कामगार सेना भुसावळ मंडळातर्फे डीआरएम कार्यालयात उद्या (दि. ६) सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन रेल कामगार सेनेचे केंद्रीय अध्यक्ष विनायक राऊत यांच्या प्रेरणेने करण्यात आले आहे. कार्यक्रमास मंडळ रेल प्रबंधक पुनीत अग्रवाल यांच्यासह रेल कामगार सेनेचे सरचिटणीस दिवाकर देव आणि केंद्रीय कार्याध्यक्ष संजय जोशी उपस्थित राहणार आहेत. तसेच डीआरएम कार्यालयातील विविध अधिकारीही कार्यक्रमाला उपस्थित राहतील.
रेल कामगार सेनेचे मंडळ अध्यक्ष ललित कुमार मुथा, मंडळ सचिव राजेश लखोटे, मंडळ कार्याध्यक्ष प्रीतम टाक, मंडळ सचिव विनोद वाघे आणि मंडळ कोषाध्यक्ष योगेश माळी यांच्यासह सर्व मंडळ शाखा पदाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.
या कार्यक्रमास सर्व रेल्वे कर्मचारी व अधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.


