गळाभेटीच्या बहाण्याने जवळ जाऊन शस्त्राने वार, दोन्ही भावांविरुद्ध गुन्हा : मंगळवारी सायंकाळची घटना, अतिश खरात जखमी, डोळ्याला गंभीर इजा

भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील न्यू आंबेडकर नगरात ३ मार्चला सायंकाळी ६.३० वाजता जुन्या वादातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाला. गळाभेटीचा बहाणा करून आलेल्या संशयिताने धारदार वस्तूने वार केले. त्यात अतिश रवींद्र खरात हा तरुण जखमी झाला. त्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली.

अतिश खरात (वय २९, रा. आंबेडकर नगर) हा आपल्या मित्रांसोबत ध्यान केंद्राजवळील मोकळ्या मैदानात बसला होता. तेथून घरी जाताना संशयित आदित्य उर्फ पायलट संजय लोखंडे आणि त्याचा भाऊ सनी संजय लोखंडे यांनी त्याला अडवले. तू इथे का आलास? अशी विचारणा करत आदित्य हा गळाभेटीच्या बहाण्याने अतिशच्या जवळ गेला. मात्र, जवळ जाताच त्याने हातातील धारदार वस्तूने अतिशच्या उजव्या डोळ्याच्या वर आणि खाली जोरदार वार केले. हल्ल्यानंतरअतिशच्या डोळ्याखालून प्रचंड रक्तस्त्राव सुरू झाला. जीव अ वाचवण्यासाठी तो घराच्या दिशेने पळत सुटला. मात्र दोन्ही भाऊ ‘याला सोडू नका’ असे ओरडत आणि शिवीगाळ करत त्याच्या मागे धावले. अतिशने घराजवळ पोहोचल्यावर आपला भाऊ राजन खरात याला आवाज दिला

संशयितांच्या अटकेसाठी पोलिसांचे पथक नेमले

याप्रकरणी शहर पोलिसांनी आदित्य लोखंडे आणि सनी लोखंडे या दोन्ही भावांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संशयितांनी खरातवर धारदार वस्तूने वार केले. त्यांच्या अटकेसाठी पथक रवाना करण्यात आले.

उद्धव डमाळे, पोलिस निरीक्षक, भुसावळ शाहर