भुसावळ (प्रतिनिधी ) – धुलीवंदनाच्या निमित्ताने वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी आपल्या कुटुंबासमवेत व आप्तेष्टांना रंग लावून शुभेच्छा देत रंगोत्सव साजरा करत आनंदाचे क्षण अनुभवले. यावेळी त्यांच्या पत्नी सौ रजनी रजनी सावकारे यांनी पर्यावरणपूरक कोरडे रंग वापरत पाण्याचा अपव्यय टाळण्याचा संदेश दिला.

धुलीवंदनाचा सण साधेपणाने आणि पर्यावरणाची काळजी घेत साजरा करण्यावर त्यांनी भर दिला. निसर्गपूरक पद्धतीने रंगोत्सव साजरा करताना नवचैतन्य, सकारात्मकता आणि एकोप्याचा संदेश समाजात रुजावा, अशी मनापासून इच्छा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी कुटुंबीयांसमवेत आनंदी वातावरणात रंगांची उधळण झाली. “रंगांच्या या सणातून प्रत्येकाच्या आयुष्यात प्रगती, आनंद आणि उत्साह फुलत राहो,” अशा शुभेच्छाही ना. सावकारे यांनी दिल्या.



