नायगाव – मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव येथे गेली दहा दिवशीय भारतीय बौद्ध महासभा महिला उपासिका प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्या सांगता समारोप आज करण्यात आला.
शिबिराच्या अध्यक्ष स्थानी मुक्ताईनगर तालुक्यातील तालुका अध्यक्षा पुष्पा सपकाळे ह्या अध्यक्ष स्थानी होत्या. शिबिराच्या प्रमुख मार्गदर्शक नांदेडच्या ज्योती कुंटे यांनी केले
तर प्रमुख उपस्थितीत महिला जिल्हा अध्यक्षा प्रियांका अहिरे, जिल्हा सरचिटणीस वैशाली सरदार, जिल्हा अध्यक्ष सुमंगल अहिरे, जिल्हा उपाध्यक्ष पर्यटन व प्रचार विभागाचे प्रकाश सरदार,मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष रविंद्र मोरे, कोषाध्यक्ष पंडित सपकाळे, बोदवड तालुका सरचिटणीस प्रमोद सुरवाडे, जिल्हा संघटक दिलीप पोहेकर, केंद्रीय शिक्षिका भारती तायडे, उत्तम प्रधान, गोविंदा तायडे हे होते.
उपस्थित प्रमुख पदाधिकारी यांनी शिबिरातील महिलाना मार्गदर्शन केले.
प्रत्येक प्रशिक्षित महिला उपासकांना संस्थेकडून प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशा पोहेकर यांनी केले.




