भुसावळ प्रभाग क्र.२ मध्‍ये नागरिकांची तापमान व आक्‍सीजन मोजणी सुरू

भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरात कोरोना एका विस्फोटा सारखा वाढत असून वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, आज दि.२७ मे पासून, वार्ड क्र. २ मधे सर्व नागरिकांचे शरीराचे तापमान व आॅक्‍सीजन तपासण्याची सुरुवात करण्‍यात आली आहे.
भुसावळ नगरपरिषदेतर्फे आशा वर्करचे ४ पथक या साठी काम करत आहेत.या तपासणीच्या कामाची पाहणी करताना नगरसेवक उल्हास पगारे यांच्या निदर्शनास आले की,तपासणी करणाऱ्या आशा वर्कर यांच्या कडे हॅन्‍ड सॅनिटायझरची खूपच कमतरता होती.अशा परिस्थितीत उल्हास पगारे यांनी स्वतः सॅनिटायझर आणून आशा वर्कर यांना दिले व नागरिकांची तपासणी करत असतांना स्वतःची सुद्धा काळजी घ्यावी असेही आशा वर्कर यांना सांगितले. काही अशा वर्कर यांना ताप व आॅक्‍सीजन मोजता येत नव्हता, हा प्रकार लक्षात येताच उल्हास पगारे यांनी वैद्यकीय अधिकारी, व प्रांताधिकारी रामसिंग सुलाने यांचेशी संपर्क करून हा सर्व प्रकार सांगितला. तात्काळ प्रांत सुलाने,महीला वैद्यकीय अधिकारी डॉ.किर्ती फलटणकर हे अन्‍य अधिकाऱ्यांसोबत समतानगर येथे दाखल झाले.सर्व माहिती जाणून घेत आशा वर्कर यांना चांगले प्रशिक्षण द्या व प्रभावीपणे काम करा असा आदेश प्रांत सुलाने यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिला.
या पुढे, कोणत्याही नागरिकाला सर्दी,ताप,खोकला किंवा श्वास घेण्यास त्रास असेल त्यांनी लवकरात-लवकर वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांना सुचवावे, जेणेकरून त्यांच्यावर उपचार करून त्यांना लवकर सुखरूप घरी परत आणता येईल, असे आव्हान उल्हास पगारे यांनी नागरिकांना केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *